निरागस - Niragas | Official Music Video 2020
कोरोना - आजारपण - लाॅकडाऊन - बेरोजगारी - उपासमार - मानसिक ताण 👆🏻 या साखळीमुळे मनुष्यजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. आणि त्याअनुषंगाने सतत चालू असणार्या बातम्यांमुळे समाजातील निरागस बालमनावर त्याचा खूपच खोलवर परिणाम होत आहे. त्यामुळे त्या निरागस जीवाच्या अगदी जवळ असणार्या त्याच्या लाडक्या निरागस गणपती बाप्पाजवळ तो या संकटाला दूर करण्याची प्रार्थना अगदी निरागस मनाने करत आहे. त्याची हीच आर्त प्रार्थना, विनंती आणि समाजाप्रती असणारी निरागस भावना आम्ही या विडीओच्या माध्यमातून घेऊन आलो आहे. नक्कीच आपणास हे गीत आवडेल अशी अपेक्षा करतो.
🙏🏻धन्यवाद 🙏🏻
Watch Full Song Click here
जीवनगाथा - Jivangatha
Yogesh Adsule | Marathi Rap Song
जन्म आणि मृत्यू या दोन किनाऱ्यातील लाटेचा प्रवास म्हणजेच जीवन. जन्म आणि मृत्यू यामधील अनुभवांचं गाठोडं म्हणजे जीवन. खऱ्या अर्थाने हे गाठोड बांधण्यासाठी समुद्रातील लाटांप्रमाणे जीवन पटलावर खूप हेलकावे खावे लागतात. बरेचदा समुद्रामध्ये निश्चयांचे पूल बांधावे लागतात. आणि हे फुल पार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यावेळी येणाऱ्या अपयशातून मिळणारे वेगवेगळे मार्ग आणि येणाऱ्या यशातून सर्जनशील विचारांचा आदर्श आपल्याला या गाठोड्यात बांधून ठेवायचा असतो. जेव्हा हे गाठोडे उघडले जाईल तेव्हा त्यातून बाहेर पडणारी प्रत्येक गोष्ट ही आपली जीवनगाथा असते.
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्याची त्याची स्वतःची एक जीवनगाथा असते. अशीच माझी जीवनगाथा मी या रॅपच्या माध्यमातून आपल्या समोर मांडत आहे. मी पहिल्यांदाच रॅप करत आहे. माझा रॅप आपणास आवडेल ही अपेक्षा व्यक्त करतो.
🙏🏻धन्यवाद 🙏🏻
Watch Full Song Click here
RAJA MANACHA | राजा मानाचा
तूच देवा गणराया बुद्धीच्या देवता, सजली ही धरती तुझ्या जल्लोशी स्वागता, प्रारंभ करी शुभकार्या ओठी नाव घेता तुझे, कृपा करी भक्तावर सफल होई कार्य माझे , तुझे-माझे सोडून आम्ही जात-धर्म जोडून हा स्वार्थभाव तोडून हाती नाव तुझे कोरुन, चोरून नाही बिंधास्त होती तुझे चर्चे खरेखुरे कष्ट करती मंडळाचे कार्यकर्ते.
वर्गनी पासून आमची योजना महिनाभर आधि घोषणा पावतीबुक दे रे दोस्ता कट्टर-खतरनाक जोष हा, ढोल-ताशा ची पण जोडणा नैवैद्य तुझा गोड हा, चिंता तू सारी सोड जा तू शिव-पार्वतीचा पोरगा.
Watch Full Song Click here
Download Official Audio Click here
विषय हार्ड - Vishay Hard Kolhapur
Vinay & Rishabh
घ्या अविची मीटिंग सोबत
कोल्हापुरी कटिंग Rap




No comments:
Post a Comment