मित्रांनो, एका बाल भक्ताचं गणपती बाप्पावर असणारं प्रेम, हे अतुलनीय असतं. आणि अशाच एका भक्ताची आतुरता व्यक्त करणारं, मनाला स्पर्श करणारं गीत घेऊन आलो आहोत. आशा आहे, तुम्हाला हे गीत नक्की आवडेल. आवडल्यास हे गीत जास्तीत-जास्त भक्तांपर्यंत पोहचविण्यास, आमची सहाय्यता करा.
🔴Video Credits🔴
🔹Dop - Pravin Raghvan & Swpnil Kamu
🔹Story / Concept / Director - Yogesh Adsule
🔹Artist - Grishma Shinde , Gaurav Bune & Yogesh Adsule
🔹Editz - Sumit Sawakhande.
🔹Special Thanks - Shivaji Patil , Dipak Jadhav , Priyanka Shinde , Sulochana Shitole, Sanjay Nighvekar, Dhanaji Padaval, Anuj & Padalwadi Gramasth.
🔴Audio Credits🔴
🔹Music Production / Lyrics / Mix Master - Suyash Shitole
🔹Singers - Apurva Javale , Kapil Malake , Suyash Shitole , Preeti Patil , Sarakshi Kamble ,Tritha Thakur & Tanaya Thakur.
🔹Recorded @ - VR Team Studio Kolhapur.
🔹Special Thanks - Sanjay Pawar, Pratiksha Sawant, Vinayak Javale, Megha Patil , Sakshi Kamble , Sidhhi Thakur , Vinay Kandekar , Rishabh Patil, Sujay Thakur.
🔹Lyrics🔹
दरवर्षी येतो बाप्पा
आमच्या तू गावी
माझ्या घरी ही ये ना
रुसले मी आहे बाप्पा
कट्टी मी आहे बाप्पा
रुसवा तू माझा मोड ना
बाप्पा ये ना बाप्पा
बाप्पा ये ना बाप्पा..ll
ज्या रुपी तू पाहशी
त्या रुपी तो पावतो
भक्ताच्यासाठी मायेचा हात हा
नेहमी उभा राहतो
कट्टी तू सोड बाळा
रुसवा तू मोड बाळा
बाप्पा तुला ही ऐकतो
बाप्पा.... बाप्पा....
बाप्पा माझा वेगळा
बाप्पा माझा वेगळा
मोरया वेगळा
बाप्पा माझा वेगळा ll2ll
ना दिसे जरी तू कोणाला
पाठीशी तू राहतो
प्रार्थना जी करिता आम्ही
तू हकेला धावतो
बाप्पा... बाप्पा...
मोरेश्वरा
हे बाप्पा
चरणी तुझ्या ही प्रार्थना
लाभो मनाला ध्यास तुझा
सदैव ही
कामना
बाप्पा माझा वेगळा ll4ll
No comments:
Post a Comment